Saturday, September 11, 2010

सायंकळी

तूच हसावे तूच फुलावे सयंकाळी
मंजुळ गाणे तूच म्हणावे सायंकाळी
डोकावे बघ चंद्र कसा तो बघण्या तुजला !
गाली काळे तीट असावे सायंकाळी
अंधाराचे राज्य नको या धरती वरती
समईची तू ज्योत बनावे सायंकाळी
तू हसताना मोती गळती टपटप खाली
स्मीत फुलांना तू शिकवावे सायंकाळी
स्वप्नपरी तू झोप उडवली मान्य तरी पण
स्वप्न तुलाही गोड पडावे सायंकाळी
माझ्या मधला आशिक तू का जागा केला ?
बेचैनीचे कारण व्हावे सायंकाळी
ग्रहणापूर्वी राहू केतू पीडा देती
पुनवेला तू चंद्र नसावे सायंकाळी
गुपचुप गुमसुम मैफिल कसली? मरगळ सारी
साकी तू प्याल्यास भरावे सायंकाळी
कैदच असते मोही भ्रमरा रात्रीला पण
"निशिकांता" तू मुक्त करावे सायंकाळी

निशिकांत देशपांडे मो.न. 98907 99023
E Mail: nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा

No comments:

Post a Comment