सोडून साथ माझी, का तो असा पळाला?
अंधूक द्या कवासा अंधार शोधण्याला
माझे जमू न शकले माझ्यासवेच देवा
वारीत चालतो मी नाते विणावयाला
अतृप्त माणसांना मृगजळ हवे हवेसे
निघतात रोज झुंडी शहरी वसावयाला
लोकांस दाखवाया, आहे सुखी म्हणोनी
कारण असो, नसो मी, शिकलो हसावयाला
वठता गळून जाणे, नव निर्मितीच असते
असती अधीर पाने, नवखी फुटावयाला
आप्तात शेकड्याने का मयसभा असाव्या?
समजून ओल जाता, दिसती झळा जिवाला
ओळी अनेक दु:खी आहेत; पण सुचेना
मिसरा विरुध्द अर्थी शेरात गुंफण्याला
होता जरी मिळाला, वृध्दाश्रमी जिव्हाळा
औलाद श्राध्द करते, श्रावण बनावयाला
श्रमला अजन्म खळगी भरण्यास त्या जिवाला
"निशिकांत" वेळ नसतो गझला लिहावयाला
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
अंधूक द्या कवासा अंधार शोधण्याला
माझे जमू न शकले माझ्यासवेच देवा
वारीत चालतो मी नाते विणावयाला
अतृप्त माणसांना मृगजळ हवे हवेसे
निघतात रोज झुंडी शहरी वसावयाला
लोकांस दाखवाया, आहे सुखी म्हणोनी
कारण असो, नसो मी, शिकलो हसावयाला
वठता गळून जाणे, नव निर्मितीच असते
असती अधीर पाने, नवखी फुटावयाला
आप्तात शेकड्याने का मयसभा असाव्या?
समजून ओल जाता, दिसती झळा जिवाला
ओळी अनेक दु:खी आहेत; पण सुचेना
मिसरा विरुध्द अर्थी शेरात गुंफण्याला
होता जरी मिळाला, वृध्दाश्रमी जिव्हाळा
औलाद श्राध्द करते, श्रावण बनावयाला
श्रमला अजन्म खळगी भरण्यास त्या जिवाला
"निशिकांत" वेळ नसतो गझला लिहावयाला
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment