Thursday, July 15, 2010

औषध मदिरा

ओघळणारे अश्रू पुसण्या औषध मदिरा
हरलेल्याना दु:ख विसरण्या औषध मदिरा
तारेवरची कसरत आहे जीवन जगणे
थरथरणारे पाय घसरण्या औषध मदिरा
दुसरे विजयी झाले याची तगमग मजला
ठसठसणारे शल्य विसरण्या औषध मदिरा
सन्मार्गाला सोडुन जाती मोहामागे
चिखला मध्ये पुरते फसण्या औषध मदिरा
मजला सल्ले लाख मिळाले गोन्धळलो मी
काय करावे पुढती कळण्या औषध मदिरा
साध्य न झाले धेय्य मला मी तुटलो, थकलो
म्र[mru]गजळ पुढती मागे पळण्या औषध मदिरा
तरुणाईच्या आठवणीने बेचैनी का?
खिन्न मनाला आज रिझवण्या औषध मदिरा
ह्र्दयावरती नाव कशाला लिहिले न कळे
भळभळणारया जखमा सुकण्या औषध मदिरा
गळणार्-या अश्रूचे आता एकच कण्हणे
पाश्चातापी धगधग जळण्या औषध मदिरा
सुटका माझी लवकर व्हावी देवा आता
म्रु[mru]त्त्युसन्गे हात मिळवण्या औषध मदिरा
शुन्य कमवले "निशिकान्ताने" जगता जगता
नादारीचे खाते लिहिण्या औषध मदिरा

निशिकान्त देशपान्डे
प्रतिसदाची प्रतिक्षा मो न 98907 99023

No comments:

Post a Comment