Saturday, July 17, 2010

मीच आहे घडविले

मी जसा आहे तयाला मीच आहे घडविले
राहिलो तोर्-यात जगलो ना कुनाला विनविले
आरसा हा दवितो मज चेहरा आहे तसा
मुखवट्याने चेहर्-याला मी कधी ना सजविले
वाल्मिकी होणे न जमले खन्त याचि मज नसे
पाप वाल्या कोळियाचे मी न केले करविले
मान्डला नाही कधी बाजार दु:खाचा कुठे
पेट्लेल्या वेदनाना आसवाने शमविले
सोबती आन्धार आहे मी उजेडा पारखा
गप्प जगलो मी कुणाचे दीप नाही विझविले
सण दिवाळीचा कशाला साजरा करता तुम्ही?
लाउनी पणत्या हजारो का गरिबा हिणविले?
लक्तरे पाहून माझी ना कुणी हेलावले
माझिया गजला सुरानी सर्व लोका रडविले
कोण म्हणतो भार होतो या धरेला आमुचा?
भार ज्यान्चा होतसे त्यानीच का हे ठरविले?
घेतले काहीच नाही या जगी पण मी तरी
श्वापदान्चे पोट भरण्या प्रेत माझे पुरविले
का अशी डोळे मिटूनी न्याय करते देवता?
पोन्चलेले हात ज्यान्चे परारड्याला झुकविले
काळजी "निशिकान्त" आहे जग निघाले हे कुठे?
पान्डवाना कोठदी अन कौरवाना मिरविले

प्रतिसादाची प्रतिक्षा मो न 98907 99023
e mail nishides1944@yahoo.com

No comments:

Post a Comment