हे, ते जगात माझे सारा अभास आहे
सा-या जगात माझा बस एक श्वास आहे
आहे तरी कुणाचा? माझे मला कळेना
अपुल्यात आज दिसतो रेशीम फास आहे
मी गारवा सुखाचा जगलो पसा भरूनी
बाकी गरम उन्हाळा साथीस प्यास आहे
भगवे बघून कपडे करता सलाम कळले
कपड्यात वासनांची सजली अरास आहे
मोठा म्हणून पूजा केली कधी जयाची
जवळून आज कळले तो एक भास आहे
नेते म्हणून ज्यांची टिमकी जगात वाजे
जपण्यास स्वार्थ अपुला त्यांचा प्रयास आहे
नाती जगी बघाया आम्ही कुठे निघालो?
रस्त्यात आज माझी कुजतेय लाश आहे
ऍशा जगी कशाला अपुले कुणी असावे?
प्राण्यात मुल्य असते माझा कयास आहे
"निशिकान्त"घेतला तू अपुला म्हणून ज्याला
कांही क्षणात बनला निश्वास श्वास आहे
निशिकान्त देशपान्डे मो. न. 98907 99023
E mail nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची प्रतिक्षा
No comments:
Post a Comment