स्वछन्द मस्त जगणे माझा स्वभाव आहे
दु:खात शान्त निजणे माझा स्वभाव आहे
गरिबीत पाहिल्या मी हसर्या अनेक जखमा
त्या कोन्दणी सजवणे माझा स्वभाव आहे
हे पाहिजे मला अन ते पाहिजे कशाला?
खुशहाल मस्त जगणे माझा स्वभाव आहे
वस्तीत आज माझ्या रडणे निशिध्द आहे
हसणे कधी हसवणे माझा स्वभाव आहे
मजला नकोत कुबड्या अथवा शिड्या कुणाच्य
लागून ठेच चढणे माझा स्वभाव आहे
बाजार आज भरले ईमान शील विकाण्या
सौदे कधी न करणे माझा स्वभाव आहे
वाटेत लाख काटे मज काळजी कशाला?
येता प्रसन्ग उडणे माझा स्वभाव आहे
उध्दार मम कराया देवास हाक कैसी
करणे प्रयत्न झटणे माझा स्वभाव आहे
पाठीत वार केले मजला न राग त्यान्चा
वाईट ते विसरणे माझा स्वभाव आहे
तन्द्रीत मीच माझ्या असतो तुझ्या मुळे मी
तुझिया smruतीत रमणे माझा स्वभाव आहे
उपदेश मी न केला सान्गीतली न गीता
हातात शस्त्र धरणे माझा स्वभाव आहे
माझ्या कलेवराला मम अन्गणी पुरावे
खान्द्यास भार नसणे माझा स्वभाव आहे
"निशिकान्त" तू कशाला केलीस आत्महत्त्या
पिकण्या अधीच गळणे माझा स्वभाव आहे
निशिकन्त देशपान्डे मो.न.9890799023
प्रतिक्रियेचे स्वागत आहे. ईमेल nishides1944@yahoo.com
No comments:
Post a Comment