Thursday, July 22, 2010

हीच का ती माणसे?

राम भजनी रन्गणारी हीच का ती माणसे?
एकतारी छेडणारी हीच का ती मणसे?
साद देण्या द्रौपदीला आजना उरला कुणी
क्रष्ण महिमा वाचणारी हीच का ती माणसे?
जाळती नवरीस नवख्या स्त्री-भ्रुणाला मारती
स्त्रीस देवी मानणारी हीच का ती माणसे?
जो मिळे न्यायालयातुन तोच असतो न्याय का?
न्याय हरता पेटणारी हीच का ती माणसे?
श्वापदे दिसती न कोठे वाहती जखमा कशा
माणसाना चावणारी हीच का ती माणसे?
पाच सालाबाद येती मागण्या माझ्या मता
भीक ग्रहणी मागणारी हीच का ती माणसे?
मातले धर्मान्ध आता यादवी चोहीकडे
धर्म ग्रन्था समजणारी हीच का ती माणसे?
दोन धर्मातील दन्गे बाब नित्त्याची असे
व्हा सहिष्णू सान्गणारी हीच का ती माणसे?
ऐक तू "निशिकान्त" गोदा प्रश्न करते आज ही
नाथ जाता थुन्कणारी हीच का ती माणसे?

निशिकान्त देशपान्डे मो.न. 9890799023
e mail nishides1944@yahoo.com
प्रतिसादाचि प्रतिक्षा

No comments:

Post a Comment