Saturday, July 24, 2010

चेहरे मी पाहिले

बेगडी अन चमकणारे चेहरे मी पहिले
चेह-याना झाकणारे चेहरे मी पहिले
कळवळा गाळातल्यान्चा राज्यकर्ते दावती
आरशाला फसवणारे चेहरे मी पाहिले
भाग्य मन्त्र्यान्चे तयाना पक्ष श्रेष्ठी पावली
जी हुजूरी वाकणारे चेहरे मी पाहिले
मी करू चिन्ता कशाला मुल्य जपण्याची फुका?
लाख टोप्या बदलणारे चेहरे मी पाहिले
शुभ्र खादी, देश भक्ती, त्याग झाले पोरके
तत्त्व पायी तुडवणारे चेहरे मी पाहिले
भूक पोटी, रन्ग ओठी खुणवती वारान्गणा
देह विक्रय करवणारे चेहरे मी पहिले
दाबल्याने दुर्बलान्चा थांबतो अक्रोश का?
आग डोळे ओकणारे चेहरे मी पहिले
बाळ गेला दूर देशी एकटे माता पिता
सुरकुत्यानी खन्गलेले चेहरे मी पाहिले
तुज हवा "निशिकान्त" पन्खा चार गजला खरडण्या
घाम अश्रू गाळणारे चेहरे मी पहिले
निशिकान्त देशपान्डे मो. न. 98907 99023
e mail nishides1944@yahoo.com
प्रतिसादाची अपेक्षा

No comments:

Post a Comment