रहातो कुठे कोण? कोणा न ठावे
जगावे असे की जणू मुक्त रावे
उसाच्या फडाभोवती कैक कोल्हे
शिकारीस टपले, मुलींनो जपावे!
महाभारताचा कुठे कृष्ण गेला?
कुठे द्रौपदीने निवार्यास जावे?
"उद्याला"जरी "आजची " पार्श्वभूमी
"उद्याने " भवोष्याकडे लक्ष द्यावे
जगाचा नियंता जरी देव आहे
करी कासरा घट्ट धरुनी जगावे
उसासे, उसासे किती ते उसासे!
मिळायास मुक्ती किती गुदमरावे?
बळी बोकडाचा दिल्यावर, त्वरेने
दयाळू म्हणे देव भक्तास पावे!
अशी राष्ट्रभक्तीत का कूटनीती?
कधी वाहवा! सैनिकांना म्हणावे
किती प्रश्नचिन्हात "निशिकांत "जगसी?
जुने प्रश्न सुटता नवे का दिसावे?
निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
No comments:
Post a Comment